देशातील प्रतिष्ठित आयआयटी या अभियांत्रिकी संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या माजी विधार्थ्यानी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे .आत्ता या पक्षाला निवडणूक आयोगाकडे मान्यता मिळण्यासाठी त्यांना प्रतीक्षा आहे .बहुजन आझाद पार्टी असे या पक्षाचे नाव आहे.अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओ अन्य मागासवर्गाच्या अधिकारासाठी हा पक्ष लढा देणार आहे .असे या विध्यार्थ्यानी पीटीआला सांगितले .
आमचा ५० जनाचा एक गट आहे .आम्ही सर्व जन वेगवेगळ्या आयआयटी मधून आलेलो आहोत .पक्षाचे काम करण्यासाठी आम्ही आमच्या पूर्णकालीन नोकरी सोडल्या आहेत .पक्षाला मान्यता मिळण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज दिला आहे .असे २०१५ मध्ये आयआयटी दिल्हीतून पदवी मिळवलेल्या नवीन कुमार यानी सांगितले .ते या पक्षाचे नेतृत्व करत आहेत .अर्थात पक्षाच्या सदस्यांना इतक्यात निवडणुका लढण्याची घाई नाही .कुमार याच्या म्हणण्यानुसार २०१९ या वर्षीच्या लोकसभा निवडणूक लढवणे हे त्याचे उदिष्ट नाही .आम्ही घाईघाईने कोणतेही काम करणार नाही .आणि आम्हाला मोठी संघटना बनायचे नाही .आम्ही २०२० मधील बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरवात करू वा त्यानंतर पुढील लोकसभा निवडणुकीचे लक्ष ठरवू असे कुमार यांनी सांगितले या पक्षानी सोशल मिडियावर प्रचार सुरु केला आहे .