कोरोना या संकटाला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह१८ पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कंटेनमेंट झोनमध्ये सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. सध्या या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून, आता या ठिकाणी सीआरपीरफ लावण्यात यावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.
तसेच चार मे पासून परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात परतू लागलेलं आहेत. यामुळे साहजिकच येथील उद्योगांना कामगारांची गरज भासणार आहे. त्यामुळे आता राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी कश्या उपलब्ध होतील याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. आता स्थानिक तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेऊन त्यांना रोजगाराची
संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे ते म्हणाले.
तसेच कोरोनाचे संकट टळल्यानंतर परराज्यातवून येणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी आणि नोंदणी करुन त्यांना राज्यात आणि कामाच्या ठिकाणी प्रवेश द्यावा, शहराच्या एंट्री पॉइंटवर नियम कडक करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे ते म्हणाले.