सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांच्या केबीन मधील हे फलक पाहिले की लक्षात येते हम सुधरेंगे नहीं. अधिकारी बदलुन महिने झाले तरी फलकावर नावे त्यांची पहायला मिळतात. यालाच सातारा जिल्हा प्रशासन म्हणतात. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार , मुख्याधिकारी शंकर गोरे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर बदलुन गेलेले आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर, वसंतराव मानकुमरे तरीही रुग्ण कल्याण समिती – नियामक मंडळ फलकावर त्यांची नावं झळकत आहेत. रुग्ण कल्याण समिती कार्यकारी समिती फलकाची सुध्दा तीच गत आहे. प्रशासने नागरिकांना योग्य माहिती मिळू नये हा चंगच बांधलेला दिसतो आहे सातारा जिल्हा प्रशासनाने. खरे तर याच्यावरच उपचार सुरू करण्याची गरज आहे . निरनिरळ्या कारणांनी नेहिमी जिल्हा रुग्णालय चर्चेत असते . जर फलकानासारख्या बाबींकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष नसेल तर रुग्नांनाकडे कधी लक्ष देणार . अधिकारी बदलेले तरी कामात मात्र काही बदल होताना दिसत नाही .