आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे आचार संहितेचा भंग करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. मतदारांना साड्या वाटप करताना दोघांना पकडण्यात आलंय. त्यामुळेच आचारसंहितेचा भंग झालाय. अहमदनगरला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी गाव संपूर्ण देशात आदर्श गाव म्हणून ओळखले जातेय.
तर गावाचा अभ्यासदौरा करण्यात देशभरातील अनेक मंडळी येतात. अण्णांच्या राळेगणसिद्धीने देशात वेगळी ओळख निर्माण केलीये. दरवर्षी गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती. मात्र गेल्या निवडणुकीपासून निवडणूक होत आहे.
अण्णा हजारेंच्या विचारांनाच हरताळ
मात्र यंदा तर अण्णा हजारेंच्या विचारांनाच हरताळ फासण्यात आलाय. चक्क मतदारांना प्रलोभन देण्यासाठी साडी वाटप करण्यात आलेय. सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारुती पठारे यांना मतदारांना साड्या वाटताना भरारी पथकाने रंगेहाथ पकडलेय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहेय. तर हे कृत्य निंदनीय असल्याचं माजी सरपंच लाभेश औटी यांनी म्हटलंय.
10 लाख रुपयांची कार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त
14 तारखेला सायंकाळी ही घटना घडलीये. याप्रकरणी 10 लाख रुपयांची इनोव्हा कार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त करण्यात आल्यात. तर महिलांसह 4 जणांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तूर्तास या प्रकरणी अण्णांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केलयी, मात्र अण्णांनी आयुष्यभर एकही कलंक स्वतःवर आणि गावावर लागू दिला नव्हता. तर या प्रकरणामुळे अण्णांना नक्कीच दुःख झाले असणार, यात काही शंका नसल्याचंही सांगितलं जातंय.