‘JNU‘ चा विद्यार्थी ‘उमर खालिद‘ याच्यावर फायरिंग करण्यात आली आली आहे. हा हल्ला दिल्लीतील ‘CONSTITUTION CLUB‘ जवळ झाला आहे, उमर खालिद यातून वाचला असून हल्ला करणारा मात्र पसार झाला आहे.
प्रत्यक्षदर्शी ने सांगितले कि, उमर आमच्या सोबत एका कार्यक्रमासाठी आला होता, आम्ही चहाच्या टपरीवर चहा पित होतो एवढ्यात एक पांढरा शर्ट घातलेला इसम जवळ आला व त्याने प्रथम उमरला धक्का मारला त्यामुळे उमर जमिनीवर पडला त्यानंतर या व्यक्तीने उमरवर गोळी झाडली मात्र ती उमरला लागली नाही, ती गोळी हवेत वरच्या दिशेने गेली. आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो सतत हवेत फायरिंग करत त्या ठिकाणाहून पळून गेला.
या घटनेवर JNU चा माजी विद्यार्थी नेता व उमर खालिद याचा मित्र ‘कन्हैय्या कुमार‘ याने संताप व्यक्त केला आहे, या बाबतीत त्याचे म्हणणे आहे कि, सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
दिल्ली पोलीसांचे म्हणणे आहे कि, या घटनेमध्ये कुणालाही गोळी लागली नसून घटनास्थळावरून पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे, अज्ञात इसम पळून जात असतांना त्याच्या हातातून हे पिस्तूल पडलं असाव असा अंदाज आहे.



