Monday, March 2, 2026
HomeदेशEVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन हॅकरचा धक्कादायक खुलासा

EVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन हॅकरचा धक्कादायक खुलासा

भारतात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंगचा प्रकार घडला होता. या EVM हॅकिंगबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. म्हणून त्यांची हत्या झाली, असा गौप्यस्फोट एका अमेरिकन सायबर तज्ञाकडून करण्यात आला आहे. या सायबर तज्ञाचे नाव सय्यद सुजा असे असून लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, हॅकरच्या या खळबळजनक गौप्यस्फोटामुळे भारताचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.
लंडनमध्ये आयोजित हॅकेथॉनमध्ये सय्यद सुजाने EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. भाजपच नव्हे तर आम आदमी पक्षानेही EVM हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, 2015 साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला, असाही दावा या हॅकरने केला आहे. एक विशेष बाब म्हणजे या हॅकेथॉनला सुरुवातीपासूनच काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments