प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात 7 जणांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 10 नामवंत व्यक्तींना पद्मभूषण तर 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 7 नामवंत व्यक्तींचा समावेश आहे
पद्म विभूषण
- शिंजो आबे, सार्वजनिक क्षेत्र, जापान
2. एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), कला, तामिळनाडू
3. डॉ. बेल्ले मोनाप्पा हेगडे, औषननिर्माण, कर्नाटक
4. नरेंद्र सिंग कंपनी (मरणोत्तर), विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका
5. मौलाना वहिदुद्दीन खान, अध्यात्म, दिल्ली
6. बी. बी. लाल, पुरातत्व, दिल्ली
7. सुदर्शन साहू, कला, ओडीशा
पद्मभूषण
- कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा , कला, केरळ
9. तरुण गोगोई (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, आसाम
10. चंद्रशेखर कांब्रा, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक
11. सुमित्रा महाजन, सार्वजनिक क्षेत्र, मध्य प्रदेश
12. नृपेंद्र मिश्रा, सिव्हिल सर्व्हिस, उत्तर प्रदेश
13. राम विलास पासवान (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, बिहार
14. केशुभाई पटेल (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, गुजरात
15. कालबे सादिक (मरणोत्तर), अध्यात्म, उत्तर प्रदेश
16. रजनीकांत देविदास श्रॉफ, ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र
17. तारलोचन सिंग, सार्वजनिक क्षेत्र, हरियाणा