जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीने बघता बघता 3 मजल्यांचे नुकसान केले आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
तत्पूर्वी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी या आगीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीमध्ये आग भडकल्याचे लक्षात आल्यानंतर सार्या व्यक्त केलेल्या काळजीचे आणि प्रार्थनेबद्दल धन्यवाद. आतापर्यंतची चांगली बाब म्हणजे या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले होते.कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून केवळ काही मजले जळून खाक झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर कोव्हिशिल्ड ही लस देखील सुरक्षित असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे.