राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा याच आता अडचणीत सापडल्यात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मनीष धुरी यांनी सध्या चर्चेत असलेल्या रेणू शर्मांच्या विरोधात पोलिसांत लेखी तक्रार दिलीय. वर्ष 2008 साली मनसे विभाग अध्यक्ष आणि चित्रपट सेना उपाध्यक्ष असताना मनीष धुरी त्यावेळी रेणू शर्मा ही महिला माझ्या संपर्कात आल्याचं सांगितलंय.
म्युझिक अल्बम तयार करण्यासाठी मदत करा म्हणून संपर्कात त्या संपर्कात आल्याचा खुलासा मनीष धुरी यांनी केलाय. ”तिने एकदा मला आपल्या दीदीला भेटण्यासाठी घरी घेऊन गेली होती, पण घरी ती एकटीच असून, अश्लील चाळे करायला सुरुवात केली. परंतु मी यातून कसा तरी बाहेर निघालो, त्यामुळे मी वाचलो”, असंही त्यांनी सांगितलं.
2008-09 साली माझ्या मोबाईल क्रमांकावर रेणू शर्मा हिने संपर्क केला होता : मनीष धुरी
मनसेच्या मनीष धुरींनी तक्रारीत रेणुकावर गंभीर आरोप केलेत. ”2008-09 साली माझ्या मोबाईल क्रमांकावर रेणू शर्मा हिने संपर्क केला होता. माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एके दिवशी तिने मला अंधेरीतील शेर ए पंजाबमधील आपल्या घरी बहिणीला भेटायचे आहे सांगून बोलावले. पण तिच्या घरी गेलो असता तिथे तिची बहीण नव्हती. काही वेळानंतर तिने माझ्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. पण मी तसे होऊ दिले नाही. त्यानंतर लक्षात आले की तिथे आमच्या दोघांशिवाय तिसरे कोणी तरी आहे.
ती आणि तिची बहीण दोघी मोठमोठ्या उच्चभ्रू लोकांशी मैत्री करतात आणि फसवतात: मनीष धुरी
मी कसाबसा तिथून निघालो. घडलेल्या प्रकारानंतर मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. तिचा फोन न घेणे, अशा बऱ्याच गोष्टी मी केल्या. त्यानंतर मला समजले की, ती आणि तिची बहीण दोघी मोठमोठ्या उच्चभ्रू लोकांशी मैत्री करतात, त्यानंतर फसवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. खंडणी काढण्याचा प्रयत्न करतात. तरीही आपण रेणू शर्मांवर फसवणुकीच्या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा ही विनंती”, अशी तक्रार मनीष धुरी यांनी दिलीय.
कृष्णा हेगडे काय म्हणाले?
मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं असं आहे, आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं. मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते, असेही कृष्णा हेगडेंनी सांगितले.
कृष्णा हेगडे यांचा रेणू शर्मांवर आरोप
भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या. मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या, असं कृष्णा हेगडे म्हणाले.