बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्रधान सचिव पशुसंवर्धन अनुप कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपास्थित आहेत. यावेळी माहिती देताना पशुसंवर्धन आयुक्तांनी सांगितले की, परभणीत 843 मृत कोंबड्या, ठाण्यात बगळे आणि इतर पक्षी मिळून 15, रत्नागिरीत 9 कावळे यांचे अहवाल एच5एन1 व बीड येथील 11 कावळ्यांचा अहवाल एच5एन8 असा आला आहे. उर्वरित ठिकाणचे अहवाल भोपळहून प्राप्त व्हायचे आहेत.
पशुसंवर्धन विभागाने 7 जानेवारीपासून नियंत्रण कक्ष स्थापित केला असून मृत पक्षांची माहिती घेणे सुरू आहे. बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य आणि वस्तूनिष्ठ माहिती द्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले