कराड येथे काही दिवसापूर्वीच अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना घडली होती . तर त्याच्या नंतर दोन दिवसा पूर्वीच अल्पवयिन युवकाचा खून करण्यात आला होता . आज सकाळीच सातारा शहरालगत कास रस्त्यावर पॉवर हाऊस येथे दुकानातील अंडी उधार दिली नाहीत म्हणून धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला . गृहराज्यमंत्री शुंभुराज देसाई यांच्या जिल्ह्यातच खून झाले असल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण भयभीत झाले आहे . सातारा जिल्ह्याचे गृहराज्यमंत्री असताना ही सातारा जिल्ह्यातील खुनाचे सत्र थाबंताना दिसत नाही.सातारा जिल्ह्यात अशा घटना घडणे म्हणजेच जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था तंदरुस्त नाही असेच म्हणावे लागेल .



