HomeMain Newsकोरोनाबाधितांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता अल्प दरात उपलब्ध होणार रेमडिसेव्हिर Main Newsमहाराष्ट्र कोरोनाबाधितांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता अल्प दरात उपलब्ध होणार रेमडिसेव्हिर By Chief Editor Mr. Sudhir Tupe October 15, 2020 0 1133 Share FacebookTwitterPinterestWhatsApp कोरोनाबाधितांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता अल्प दरात उपलब्ध होणार रेमडिसेव्हिर रेमडिसेव्हिर इंजेक्शन खासगी रुग्णालयांतील रुग्णांना निश्चित व अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यासाठी किमान एक औषध दुकान निश्चित करण्यात आले असून त्यानुसार राज्यातील ५९ दुकाने निश्चित करण्यात आली आहेत. त्या दुकानांमध्ये २ हजार ३६० रुपयांना रेमडिसेव्हिरचे एक इंजेक्शन मिळणार आहे. रेमडिसेव्हिर हे इंजेक्शन मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना दिले जाते. पण मोठ्या प्रमाणावर या इंजेक्शनची मागणी वाढल्याने मागील महिन्यांत प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. ही स्थिती संपुर्ण राज्यातच निर्माण झाल्याने रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळत नव्हते. आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. पण इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यापार्श्वभुमीवर इंजेक्शन अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या दरात इंजेक्शन मिळण्याची दुकानेही निश्चित करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे यावर नियंत्रण राहणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून जिल्ह्याची दैनिक गरजेनुसार आरोग्य विभागाकडे मागणी केल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेतील दररोज ५ हजार इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून देण्यात येणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडे रुग्णांच्या माहितीसह खासगी रुग्णालयांना इंजेक्शनची मागणी करावी लागेल. रुग्णाला गरज आहे की नाही, हे पाहिल्यानंतर त्याला मान्यता दिली जाईल. त्यानंतर संबंधित औषध दुकानांमध्ये इंजेक्शन मिळेल. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleसकाळपासून मुंबई, पुण्यासह अर्ध्या राज्यातील आयडिया व्होडाफोनची रेंज गायबNext article८-१० आठवड्यांसाठी टीआरपीचा खेळ बंद Chief Editor Mr. Sudhir Tupe RELATED ARTICLES Main News विलासपूर दारूमय करण्याचा डाव? गजानन प्राईडमध्ये बेकायदेशीर बांधकामावर प्रश्नचिन्ह March 1, 2026 Main News आरोप, अटक आणि निर्दोष मुक्तता February 28, 2026 Main News “साताऱ्याच्या उद्योगांना वीजेचा धक्का; विकासाला अडथळा? February 28, 2026 - Advertisment - Most Popular विलासपूर दारूमय करण्याचा डाव? गजानन प्राईडमध्ये बेकायदेशीर बांधकामावर प्रश्नचिन्ह March 1, 2026 आरोप, अटक आणि निर्दोष मुक्तता February 28, 2026 “साताऱ्याच्या उद्योगांना वीजेचा धक्का; विकासाला अडथळा? February 28, 2026 सहा दशकांचा अविजीत प्रवास February 22, 2026 Load more Recent Comments