उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी ना करता बनावट नंबर प्लेटच्या आधारावर दुचाकी वापरणाऱ्यावर काल रात्री सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . शिशिकांत सुनील पिसाळ व राहुल चंद्रकांत माने अशी गुन्हा दाखल असणाऱ्यांची नावे आहेत . श्रीधर जगदाळे यांची एम .एच – ११- सी . सी ८८८७ या नंबरची दुचाकी आहे . सातारा परिसरात कामासाठी न येता हि त्यांच्या दुचाकीवरील ऑनलाईन दंडाची आकारणी होत होती .सहा वेळा हा प्रकार घडल्या नंतर त्यांनी सातारा वाहतूक शाखेशी सपंर्क साधलं असता हा प्रकार उघडकीला आला आहे . चोरीच्या वाहनामध्ये असे प्रकार घडत असतात .गाडीचा नंबर चुकीचा लावून त्या वाहनाचा वापर केला जातो . या अगोदर अशीच एक घटना पाठीमागे सातारमध्येच घडली होती .त्यामुळे कायद्याचे पालन करून वाहन चालवणाऱ्या लोकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते . आणि विनाकारण त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करावी व त्यांच्या वर कादेशीर कारवाही करावी अशी मागणी नारिकांनमधून होते आहे .