शेतकऱ्यांच्या एफारपीची रक्कम अद्याप दिली नसून कारखान्याने दोन वेळा लेखी आश्वासन देऊन हि ऊसाची बिले दिली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे . मदनदादा भोसले यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कारखान्याचे पैसे खर्च केल्याने किसनवीर कारखान्याने शेतकऱ्यांचे ३५ कोटी थकीत ठेवले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले . किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्या दारात या पूर्वी दोन वेळा ठिय्या आंदोलन केले होते . त्यानंतर कारखान्याने २५ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे लेखी आश्वासन दिले होते . तरीही अद्याप रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही . त्यामुळे जो पर्यंत संपूर्ण रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्या दारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री . राजू शेळके यांनी सांगितले .