Saturday, August 9, 2025
HomeMain Newsमहाबळेश्वर येथे ३०० फूट दरीत पडलेल्या युवकाचे प्राण वाचवण्यात ट्रेकर्सच्या...

महाबळेश्वर येथे ३०० फूट दरीत पडलेल्या युवकाचे प्राण वाचवण्यात ट्रेकर्सच्या जवानांना यश

तीनशे फूट खोल  दरीत अठरा तासाहून अधिक  काळ अडकलेल्या  युवकास  जीवदान मिळाले . अमृत रांजणे हा ३५ वर्षाचा  युवक  हा नवी मुंबई येथे एका  कंपनी मध्ये कामास आहे . तो कंपनीतील सहकाऱ्यांसोबत महाड येथे आला  होता . शनिवारी सुट्टी असल्याने तो आपल्या मूळ गावी जाण्यासाठी महाड येथून पोलाद पूर येथे आला . येथून तो एका  खाजगी वाहनाने महाबळेश्वर कडे निघाला . वाहन अंभेनळी  घाटात आल्यानंतर तो त्या वाहनातून खाली उतरला . ते  वाहन पुढे निघून गेली व तो घाटात तिथेच दरीच्या टोकावर तो बराच वेळ उभा राहिला होता . दरीत पाहण्याच्या नादात त्या  युवकाचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला . दरीत घसरत जाऊन तो तीनशे फूट खोल दरीत खाली गेला . त्याने वाचवण्यासाठी आवाज दिला परंतु रात्र झाल्यामुळे  कोणीच प्रतिसाद दिला  नाही . रविवारी सकाळी एक नव दांपत्य त्याच ठिकाणी सेल्फी घेत असताना त्यांना वाचावा वाचावा असा आवाज आला . त्यांनी तातडीने महाबळेश्वर पोलीस स्टेशन ला फोन करून हि माहिती दिली . महाबळेश्वर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रॅकर्सना  बोलावले . ट्रेकरच्या जवानांनि बचाव कार्याचे साहित्य घेऊन घटना स्थळी धाव घेतली . ट्रेकर्सचे जवान अनिल केळघने  ,नगरसेवक कुमार शिंदे ,सुनील भाटीया ,सुनील वाडकर ,अमित कोळी ,संदीप जांभळे ,जयवंत बिरामने यांनी चार तासाच्या  प्रयत्न्न  करून  त्या युवकाला जीवदान दिले . महाबलेश्वर ट्रेकरच्या  जवानांचे महाबलेश्वर मध्ये  कौतुक होत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments