सातारा जिल्ह्यात गुरुवारी कोरोनमुक्तीने २३ हजाराचा आकडा पार केल्याचा दिलासा मिळत असताना रात्री उशीरा आलेल्या अहवालात ९१५ नवीन बाधित समोर आले . यामध्ये सातारा तालुका व शहर हॉटस्पॉट ठरले आहे . सातारा तालुक्यात तब्बल ३२२ जणांचा अहवाल बाधित आले आहेत . कराडचा वेग मंदावत असला तरी बद्ध सुरुच असून वाई ६६,कोरेगाव ५४,खटाव ३४, खंडाळा ३१ जण बाधित असून सर्वच सातारा ,कराडमध्ये तीन अंकी संख्येने बाधितवाढत आहेत . तर इतर तालुक्यात दोन आकडी संख्येने बाधितांचा आकडा समोर येतोय . तर शुक्रवारी जिल्ह्यात ३२ बाधितांचा मुर्त्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे . सातारा जिल्हयातील आज पर्यंत १०३२ झाली आहे . एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे दररोज दोन आकडी संख्येने बाधितांची मुर्त्यूची संख्या समोर येत आहे . यामध्ये पहिल्यापासून जेष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक राहिलेले आहे . ५० वयोगटापासून ९० वयोगटापर्यंत नागरिकांचा यात समावेश आहे . मुर्त्यूदर वाढत असल्याने आरोग्य प्रशासन हतबल झाले आहे कि असा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे . गेल्या दहा दिवसात बाधितांची मोठी संख्या आणि बळींची मोठी संख्या वाढली आहे . नागरिक प्रशासनाला सहकार्य करत असले तरी प्रशानाने दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे .
जिल्ह्यात ३२ लोकांचा मुर्त्यू झाला असून यामध्ये अंबवडे ता . कोरेगाव येथील ६५ वर्षीय महिला ,आणे ता . कोरेगाव ६५ वर्षीय पुरुष
जांब बुद्रुक ता . कोरेगाव ५९ वर्षीय पुरुष ,कुडाळ ता . जावळी ७० वर्षीय पुरुष ,सायगाव ता . जावळी ६६ वर्षीय महिला ,व्यंकटपुरा पेठ सातारा ७२ वर्षीय महिला ,सासपडे ता . सातारा ६५ वर्षीय पुरुष ,भक्तवडी ता . कोरेगाव ७५ वर्षीय महिला ,खेड ता . सातारा येथील ८९ वर्षीय पुरुष ,धोंडेवाडी ता . खटाव ५१ वर्षीय पुरुष ,मोरे कॉलनी ता . सातारा येथील ८० वर्षीय महिला ,साईकडे ता . पाटण ५५ वर्षीय पुरुष , निनाम पाडळी ता . सातारा
फलटण ८३ वर्षीय ५१ वर्षीय पुरुष तारने ता . सातारा येथील ९० वर्षीय महिला तसेच
जिल्ह्यातील विविध हॉस्पिटल मध्ये बुधवार पेठ फलटण ७८ वर्षीय पुरुष ,धुळदेव ता. फलटण ८३ वर्षीय तडवळे ता . कोरेगाव ७२ वर्षीय पुरुष ,सोमवार पेठ सातारा ८० वर्षीय पुरुष ,जाधवाडी नुने ता . पाटण ७५ वर्षीय महिला ,तसेच रात्री उशीरा कळविलेले आनंदनगर ता . सातारा ८० वर्षीय पुरुष ,सदरबझार सातारा ८३ वर्षीय महिला ,अतीत ता . सातारा ६५ वर्षीय पुरुष ,विद्यानगर ता . कराड ७२ वर्षीय पुरुष ,मुंडे ता. कराड ६५ वर्षीय पुरुष ,राजमाची ता ल. कराड ७६ वर्षीय पुरुष ,नाडोली ता . पाटण ५७ वर्षीय पुरुष ,कराड ७८ वर्षीय पुरुष ,पाटण ६५ वर्षीय पुरुष ,शुक्रवार पेठ ता . कराड ८४ वर्षीय महिला ,लोणंद ता. खंडाळा येथील ६५ वर्षीय पुरुष ,दुसरे ता . कराड ६० वर्षीय पुरुष ,पार्ले ता. कराड ६७ वर्षीय पुरुष असे ऐकून ३२ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मुर्त्यू झाले आहेत . असेही डॉ . चव्हाण यांनी कळविले आहे .
शुक्रवार पर्यंत जिल्ह्यात एकूण नमुने – १,१८,३५३ एकूण बाधित ३३,९८७ ऐकून कोरोना मुक्त – २३,२१५, मुर्त्यू – १०३२ ,उपचार घेत असलेले रुग्ण – ९,७४०