सातारा रेल्वे स्थानक येथे मंजूर असलेले पोलीस स्टेशन सुरु करावे तसेच व लोणंद येथे रेल्वेचे दोन पूल उभा करण्यात यावेत . अशी आग्रही मागणी खा . श्रीनिवास पाटील यांनी संसदेमध्ये केली आहे . सातारा रेल्वे स्टेशन येथे पोलीस स्टेशन मंजूर झाले आहे . परंतु अद्याप हे पोलीस स्टेशन उभा करण्यात आले नाही . अनेकदा रेल्वे मधून प्रवास करताना प्रवाशांच्या सामानाची चोरी होते . जर अशी चोरीची घटना घडली तर तक्रार देण्यासाठी पुणे किंवा मिरज या ठिकाणी जावे लागत आहे. सातारा येथे रेल्वे पोलीस स्टेशन सुरु झाल्यास प्रवाशांना पुणे किंवा मिरज या ठिकाणी तक्रारी देण्यास जावे लागणार नाही व लोकांना होणार त्रास वाचेल . त्यामुळे त्वरीत सातारा रेल्वे स्टेशन येथे मंजूर असलेले पोलीस स्टेशन सुरु करावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी संसदेमध्ये केली आहे .