सातारा जिल्ह्यात २ हजार ४०८ कोरोना संशयितांपैकी चाचणी मध्ये ७१६ लोक कोरोना बाधित म्हणून निष्पन्न झाले आहेत . जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुभाष चव्हाण यांनी हि माहिती दिली . क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय लॅबचे १९५ ,तर आगरकर मधील २३ ,कृष्णा हॉस्पिटल लॅब मधील १०२ एनसीसीएस चे ७१ तर खाजगी मधील ६४ व अँटीजेन टेस्टचे २६१ असे सगळे मिळून ७१६ रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत . जिल्ह्यात यामुळे कोरोना बाधितांची संख्या २२८६३ झाली असून आजपर्यंत १३९३७ रुग्नांवरती यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत . जिल्ह्यात विविध ठिकाणी ८३२७ कोरोनाबाधित उपचार घेत असल्याचे डॉ . सुभाष चव्हाण यांनी सांगितले .