Friday, August 8, 2025
HomeMain Newsसातारा जिल्ह्यात कोरोनाने केली शंभरी पूर्ण

सातारा जिल्ह्यात कोरोनाने केली शंभरी पूर्ण

कोरोनाचे नवीन १८ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून सातारा सिव्हील हॉस्पिटल मध्ये ५ तर कराड मध्ये १३ रुग्णांची वाढ झाली आहे .आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण  २१ रुग्णांची वाढ झाली .असल्याने आत्ता रुग्ण संख्या पोचली ११३ वरती . कराड तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी १३ रुग्णाची भर पडल्याचे आज दुपारी आरोग्य विभागाच्या अहवालातुन स्पष्ट झाले आहे .या मध्ये कराड शहरातील मंगळवार पेठेसह आगाशिवनगर ,तांबवे ,गमेवाडी,गोटे ,उंब्रज ,वनवसमाची येथील रुग्णांचा समावेश आहे . त्यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८६ वर गेल्याने कराडकर चांगलेच धास्तावले आहेत .तसेच क्रांतीसिहं  नाना पाटील रुग्णालयात आणखी पाच कोरोना बाधित सापडल्याने जिल्ह्याची संख्या ११३ वर गेली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments