सातारा जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी सौ. सुषमा शरदचंद्र राजेघोरपडे यांची निवड, सातारा जिल्हा महिलाध्यक्ष सौ. धनश्रीताई महाडिक यांनी मा. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन केली. सातारा जिल्हा महिलाध्यक्ष सौ. धनश्रीताई महाडिक व मा. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपाध्यक्षपदी नियुक्ती करून दाखवलेल्या विश्वासाबद्दल सुषमा राजेघोरपडे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी आपण पक्षाचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करून पार पाडू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची व महिला कॉंग्रेसची धेय्यधोरणे आणि विचार आपण आगामी काळात तळागाळात पोहचवू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा या मुद्यांवर आगामी काळात प्राधान्याने काम करून, महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांना सुरक्षा प्रदान करू असा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सातारा जिल्हा कॉंग्रेस महिला आघाडी उपाध्यक्षपदी सौ. सुषमा राजेघोरपडे यांची नियुक्ती.
RELATED ARTICLES