पोलिसांना निवडणूक बंदोबस्तासाठी २५०० ते १५०० रुपयाचे मानधनाची तरतूद असताना पोलिसांना काही मतदार संघातून बंदोबस्ताचे ५०० व काही ठिकाणी ८०० रुपये मानधन देण्यात आले आहे .निवडूणुकीमध्ये सगळ्यात जास्त ताण पोलिसांवर असतो .वेळेवर जेवण मिळत नाही आणि मिळाले नाही म्हणून कुणाकडे तक्रार पण करता येत नाही .हा प्रकार प्रत्येक निवडणुकीमध्ये होतो आहे .एका बाजूला कर्तव्य पार पाडायचे आणि दुसऱ्या बाजूला होणारे मानसिक शोषण पण सहन करायचे .यामुळे पोलिसांनमध्ये प्रचंड असंतोषाची लाट उसळी आहे .तसेच या बाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे .
मतदारांनी भयमुक्त,तणावमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी पोलिश बंदोबस्त ठेवण्यात येतो .यासाठी पोलिसांना मानधनाचा दर शासन निर्णय (GR )क्रमांक सीएईल २०१७/प्र .क्र २६२/१७/३३ दिनांक १६ नोव्हेंबर ,२०१७ नुसार राजपत्रित अधिकाऱ्यांना दररोज २५०० तर पोलिसांना १५०० दररोज रोख स्वरूपात मानधन देण्याचा व सदर खर्च मागणी क्र.ए -२ २०१५ निवडणुका या मुख्य लेखाशिर्षकाखाली प्रकरण नुसार अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार भागवण्याचा शासन आदेश आहे .असे असताना सुद्धा पोलिसांना १५०० रुपया ऐवजी ५०० रोख मानधन मिळाल्याने पोलिसांच्या उर्वरित १००० रुपयावर निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दरोडा टाकला आहे .
एका लोकसभा मतदारसंघात किमान २ते ३ हजार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो .प्रत्येकी १००० जरी दरोडा निवडणूक अधिकाऱ्यांनी टाकल्याचे ग्राहय धरले तर प्रत्येक मतदार संघात हि अपहाराची रक्कम वीस ते तीस लाख रुपये होते .त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसनाकडून होत आहे .
पोलिसांच्या पगारातून गतमहिन्यात ३०० वजावट करून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस कल्याण निधी मार्फत वाळलेल्या भाकरी ,५० मिली दही चटणी असा निकृष्ट आहार पोलिसांना दिल्याने ठिकठिकाणी पोलिसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .निकृष्ट भोजन ,शासन निर्णयानुसार १५०० मानधनाची तरतूद असताना हि ५०० रुपये प्रमाणे वाटप यामुळे पोलिसांमध्ये संतापाची लाट उसळी आहे .त्यामुळे पारदर्शक निवणुकीचा देखावा निर्माण करत असलेल्या निवडणूक आयोगाला हि खूप मोठी चपराक असल्याची माहिती मिळाली आहे .