Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांना ऐन गणेशोत्सवात दरवाढीचा शॉक

राज्यातील शेतकऱ्यांना ऐन गणेशोत्सवात दरवाढीचा शॉक

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर २० पैशांनी वाढविण्यात आले आहे. हे दर ३ रुपये ३५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रती युनिट असे करण्यात आले आहे. तर घरगुती वीज ग्राहकांचे ० ते १०० युनिटसाठी ५ रु. ०७ पैशावरून ५ रु. ३१ पैसे तर १०१ ते ३०० युनिटसाठी ८.७४ रु. वरून ८.९५ रुपये प्रती युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रामुख्याने शेतकऱ्यांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत आयोगाने वीज ग्राहकांना दरवाढ करुन चांगलाच शॉक दिला आहे. त्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांवर ६०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचा दावा केला जात आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन २०१८ -२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर १ सप्टेंबर २०१८ पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात विजेचा उत्पादन खर्च वाढूनही विजेच्या दरात फारशी वाढ केली नसल्याचा दावा आज राज्य वीज नियामक मंडळाने केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत विज नियामक मंडळाने मुंबई आणि महाराष्ट्रातले नवे दर निश्चित केले आहेत.

  • हायटेन्शन वीज वितरणातील मोठे औद्योगिक ग्राहकांसाठीचे दर
  • टाटा पॉवर
  • जुने दर (प्रती युनिट) – ९ रु. १२ पैसे
  • नवीन दर (प्रती युनिट) – ९ रु. ३८ पैसे

अदानी इलेक्ट्रिसिटी

  • जुने दर (प्रती युनिट) – १० रु. ०७ पैसे
  • नवीन दर (प्रती युनिट) -९ रु. ३७ पैसे

बेस्ट

  • जुने दर (प्रती युनिट) – ८ रु. ६५ पैसे
  • नवीन दर (प्रती युनिट) – ८ रु. ०६ पैसे

महावितरण

  • जुने दर (प्रती युनिट) – ८ रु. ०४ पैसे
  • नवीन दर (प्रती युनिट) – ८ रु. २० पैसे
  • उच्च दाब वितरण (वाणिज्यिक वापर)

टाटा पॉवर

  • जुने दर (प्रती युनिट) – ९ रु.७१ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – ९ रु. ९० पै.

उच्च दाब वितरण (वाणिज्यिक वापर)

  • अदानी
  • जुने दर (प्रती युनिट) – १० रु. ७६ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – १० रु. ०५ पै.

 

  • बेस्ट
  • जुने दर (प्रती युनिट) – ९ रु. १७ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – ८ रु. ५६ पै.

 

  • महावितरण
  • जुने दर (प्रती युनिट) – १३ रु. ४७ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – १३ रु. ८० पै.

 

  • लघुदाब वितरण (छोट्या उद्योगांसाठी)

 

  • टाटा पॉवर
  • जुने दर (प्रती युनिट) – ८ रु. ३४ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – ८ रु. १९ पै.

 

  • अदानी
  • जुने दर (प्रती युनिट) – ९ रु. ३७ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – ९ रु. ३७ पै.

 

  • बेस्ट
  • जुने दर (प्रती युनिट) – ८ रु. ४३ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – ७रु. ५२ पै.

 

  • महावितरण
  • जुने दर (प्रती युनिट) – ७ रु. ८३ पै.
  • नवीन दर (प्रती युनिट) – ८ रु. २५ पै.

 सुनावण्याचा वेग गतिशील

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नवीन सदस्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोगासमोर येणाऱ्या प्रकरणांवरील सुनावण्या वेगाने करण्यावर भर दिला आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत १६० प्रकरणांवर आयोगाने निर्णय दिला असून प्रती महिन्याला १३ प्रकरणे निकाली काढली आहेत. तर १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत प्रती महिन्याला १७ या प्रमाणे २०४ प्रकरणे निकाली काढली आहेत.

तर १ एप्रिल २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रती महिन्याला ३३ या प्रमाणे १६५ प्रकरणे निकाली काढली आहेत. पुढील काळात प्रत्येक महिन्याला ४० पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

एका याचिकेवर १२० दिवसात निकाल देणे अपेक्षित असताना या मंडळाच्या सदस्यांनी सातत्याने कामे करून २७ दिवसात प्रकरणे निकाली काढून १८ दर पत्रके मंजूर केली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इलेक्ट्रिक वाहन वापरासाठी प्रोत्साहन

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरामध्ये अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रती युनिट ६ रुपये दर ठरविण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) ७० रुपये प्रती केव्हीए/महिना असा ठरविण्यात असल्याचेही श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments