मंगळवारी सायंकाळी वृध्दापकाळातील आजारांमुळे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे निधन झाले. संपूर्ण तामिळनाडूवर त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. करुणानिधी यांचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी मोठे योगदान होते. त्यामुळे पुढील आठवडाभर तामिळनाडूमध्ये कोणताच चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय तामिळ सिनेसृष्टीने घेतला आहे.
त्याचबरोबर राज्यातील सर्व फिल्मी इव्हेंट्सही रद्द करण्यात आले असून ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी आपल्या ट्विटवर याबाबतची माहिती दिली. तसेच राज्यातील सर्व दारुंची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेशही जारी केला असल्याचे त्यांनी सांगितले. करूणानिधी यांच्या निधनावर रजनीकांत यांनी शोक व्यक्त करत हा एक काळा दिवस आहे. मी कधीही या दिवसाला विसरू शकत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे म्हटले आहे. राजाजी हॉल येथे करुणानिधी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. येथे अनेक दिग्गजांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली.