प्रभाग १ मधील नगरसेविका सौ. सीता हादगे यांचे प्रेरणेने रविवार पेठ येथे गीतांजली शाळा क्रमांक १५ मधील शालेय साहित्य आणि फळे वाटपाचा कार्यक्रम घेऊन .लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली .या वेळी अण्णाभाऊनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाजात क्रांती आणण्याचे काम महाराष्ट्रात नाही तर देशात त्यांचे योगदान मोठे आहे .अशा महापुरुषाची जयंती साजरी करताना सर्वांनी एकत्र येऊन करूया असे प्रतिपादन कवी प्रदीप कांबळे यांनी केले .यावेळी उपनगराध्यस सुहास राजेशिर्के,मा.राजू भोसले,पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर,नगरसेविका सविता फाळके,नगरसेविका सौ. सीता हादगे,कवी प्रदीप कांबळे,मा-शिक्षण सभापती भाऊसाहेब पाटोळे,तानाजी बडेकर,मनोज घाडगे,अजय घाडगे,हॉकर्स नेते,संजय पवार ,मुख्याध्यापक बेचके सर,सर्व शिक्षक ,विद्यार्थी सर्व पेठेतील नागरिक,व महिला उपस्थित होते .अण्णाभाऊनी विषमतेची दरी मोडीत काढून टाकण्यासाठी विषमतेच्या विरोधात लढले म्हणूनच आम्ही घडलो . त्यांचा आदर्श विचार आपण सर्वांनी आत्मसात करूया असे या वेळी पाणी पुरवठा सभापती अबेकर यांनी आव्हान केले .पुढे बोलताना राजू भोसले म्हणाले कि अण्णाभाऊ साठे यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या थोर महापुरषाचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन सर्वांनी जीवनात वाटचाल करावी .खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद सर्व शाळानमधील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळाले पाहिजे या साठी नगरपरिषद शाळा ना भौतिक सुविधा पुरवण्यात येतील असे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सांगितले या प्रभागातील मुलांसाठी नवीन बांधण्यात आलेल्या सभागृहामध्ये लवकरच अभ्याशिका वर्ग चालू करण्यात येणार असल्याचे नगरसेवका सौ .सीता हादगे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद बेचेके यांनी केले तर आभार अजय घाडगे यांनी मानले
अण्णाभाऊनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाजात क्रांती आणण्याचे काम केले – कवी प्रदीप कांबळे
RELATED ARTICLES