“मी कुणाच्या आधारावर नाही. स्वतःच्या हिमतीवर आहे. मी कॉलर उडवतो यापुढेही उडवत राहणार. तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय. माझ्या सारखा कोणी वाईट नाही. माझ्या कॉलर वर बोलायचे असेल तर समोर येऊन बोलावे”. असा इशाराच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता दिला.
रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य पदी निवडीवरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या शैलीत चौफेर तोफ डागली. उदयनराजे म्हणाले, मी केलेली नौटकी दिसते. लावणी म्हणतो, या पुढेही करतच राहणार. मी नेहमीच खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझ्या वागण्यात बदल होणार नाही. मी तत्व सोडून बोलत नाही. माझ्या स्वभावात बदल करू शकत नाही. “मैं ने एक बार कमिटमेंट कर दी, तो मै खुद की, बी नही सुनता” असाही टोला लगावला.
सातारा राजधानी महोत्सव या कार्यक्रमातून जिल्हातील विविध क्षेत्रातील मुलांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे. याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये. अजूनही असा कोणीही प्रयत्न केला नाही. मुलाच्या भवितव्यासाठी काम करत राहणार आहे असंही उदयनराजे म्हणाले.
रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवडीवरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. राजघराण्यातील मला नको पण शिवेंद्रसिंहराजे यांना तरी संस्थेवर घ्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. ज्यांचे योगदान नाही अशा लोकांची निवड करून राजघराण्याला डावलले गेले अशी नाराजी व्यक्त केली.
राजघराण्याच्या वतीने देण्यात येणा-या हा पुरस्कार स्विकारण्या करीता अमिताभ बच्चन येणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. एवढ्या मोठ्या व्यक्तीला साताऱ्यात आणण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत असंही उदयनराजे म्हणाले.