Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारची घोडचूक ,’लोकराज्य’ मध्ये आंबेडकरांऎवजी विलासरावांचा फोटो

राज्य सरकारची घोडचूक ,’लोकराज्य’ मध्ये आंबेडकरांऎवजी विलासरावांचा फोटो

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे सरकार चालतय असं म्हणाऱ्या मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या सरकारने घोडचूक केली .राज्य शासनाने लोकराज्य या मासिकाची इंग्रजी आवृत्ती असलेल्या ‘महाराष्ट अहेड ‘ मासिकात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेषांकात त्यांचा चुकीचा फोटो छापण्यात आला आहे .विद्यार्थी काळातील आंबेडकरचा फोटो म्हणून शासनाच्या मुखपत्रात चक्क दिवगंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालपणीचा फोटो छापण्यात आल्याची घोडचूक झाली .यामुळे आंबेडकर अनुयायी आणि विचारवंतानी तीव्र नाराजी व्यक्त केली .डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारामुळे सरकार चालतय असं म्हणाऱ्या मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या सरकारने अक्षम्य घोड्चूक केली आहे .महाराष्ट्र शासनाचे  लोकराज्य या मासिकाची इंग्रजी आवृत्ती’महाराष्ट अहेड ‘मधील लेखात बाबासाहेबांचा विधार्थी दशेतील फोटो म्हणून चक्क माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बालपनीचा फोटो छापण्यात आला  आहे .या फोटोची कोणतीच शहनिशा न करता राज्य शासनाने एक जबाबदार मासिक असं कस करू शकते असा प्रश्न अंबरनाथच्या एका तरुणाने उपस्थित केला आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments