२०१७ साली आपल्या देशात जी संपत्ती निर्माण झाली,त्यापैकी ७३% संपत्ती १% लोकांकडे गेली आहे.हे १% लोक म्हणजे आपल्या देशातील श्रीमंत लोक आहेत .यावरून आपल्या देशात आर्थिक विषमता किती वेगाने वाढत आहे, हे कोणाच्याहि ध्यानात येऊ शकेल.’ऑक्सफम संस्थेने या अर्थाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे .त्यावरून देशाचा विकास कोणत्या दिशेने चालला आहे,कुणाचा विकास कोण्या गतीने होत आहे,हे पुढे येत आहे .’सबका साथ सबका विकास अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे धोरण कुणाच्या हिताचे आहे,हे देखील या अहवालाने पुढे आले आहे .
आर्थिक विषमता हि संपूर्ण जगाला भेडसावणारी एक समस्या आहे .भांडवलशाही देशात ह समस्या अधिकच गंभीर बनल्याचे दिसते ‘१९२२-२०१४ :ब्रिटीश राज ते अब्जाधीश राज ‘ या नावाने जागतिक विषमता अहवाल प्रसिध्द झाला आहे .या अहवालानुसार १९२२ साली भारतात प्राप्तिकर कायदा आला .तेव्हापासून हळूहळू भारतात विषमतेची दरी वाढतच घेली आहे .१९३० मध्ये १% भारतीयांकडे देशची २१% संपत्ती होती.१९८० मध्ये ती ६% नि घटली ‘तर २०१४ मध्ये ती २२% नि वाढली होती,असे या अहवालात म्हटले आहे .गरिबी हटविण्याची,वंचित आणि शोषितांचा विकास करण्याची भाषा मोदी सरकार करीत आहे .आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास होत असल्याचा दावा मोदी सरकार करीत आहे .या अहवालानुसार २०१७ मध्ये देशातील ६७ कोटी उत्पनात गेल्या वर्षभरात केवळ १%ची भर पडली आहे .या उलट,आपल्या देशातील १% चालू वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या जवळपास जाणारा हा आकडा आहे .
गतवर्षी भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत १७ ने भर पडली .देशात १०१ अब्जाधीस आहेत .२०१० पासून अब्जाधीशांच्या संपत्तीत दरवर्षी सरासरी १३% वाढ होते आहे .सर्वसामान्य कामगाराच्या वेतनात मात्र सरासरी २% वाढ होत आहे .यावरून श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत आहे .हि गोष्ट कोणाच्याही ध्यानात येऊ शकेल जगभरातील प्ररिस्थिती फारशी समाधानकारक नाही .असे या अहवालात दाखवले आहे .जगातील ८२% संपत्ती १% श्रीमंताच्याकडे आहे .याउलट जगातील ३ अब्ज ७ कोटी लोकांच्या उत्पादनत २०१७ मध्ये काडीचीही भर पडलेली नाही .