Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रसंपूर्ण महाराष्ट्र कागदावरती हागणदारी मुक्त झाला ....

संपूर्ण महाराष्ट्र कागदावरती हागणदारी मुक्त झाला ….

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची नुकतीच घोषणा केली .परंतु कित्येक खेड्यात आजच्या परिस्थितीमध्ये गावात शौचालयेच नसल्याने समोर आले .तर काही गावातील लोक आज हि उघड्यावर शौचालयास जातात याची पडताळणी न करताच महाराष्ट्र हागणदारीमुक्त कसा झाला  हे महाराष्ट्रातील काही गावात केलेल्या सर्वेक्षण ना वरून पुढे आले. कित्येक गावात प्रवेश करताना नाकावरती रुमाल धरूनच जावे लागते .या मध्ये आज घडीला तरी काही हि बदल झाला नाही .

राज्यातील काही गावात पाहणी केली असता नाशिक जिल्यातील ३५० लोकसंख्या असलेल्या सिनर तालुक्यातील धोडबर गावात एकून ४० शौचालये आहेत .पण ती निकृष्ट दराज्याची आहेत .गावात आज हि लोक उघड्यावरती च शौचालयास जाताना दिसतात .त्या नंतर अमरावती मधील सलोना गावात तीन महिन्या पूर्वी १७५ शौचालये बांधली होती .या गावाची कुटुब संख्या ४५० च्या आसपास असल्येया या गावात आज हि लोक उघड्यावरती शौचालयास जातात त्यानंतर यवतमाळ जिल्यातील टाकळी या गावात शौचालये बांधली परंतु पाणीच नाही .ज्या गावात पाणी पिण्यास मिळत नाही तिथे शौचालयास पाणी कुठून आणणार या गावात केवळ पाणी नसल्याने हि शौचालये पडून आहेत .

कोकणातील पालघर दहयाळे चंदी पावन हे आदिवाशी पाड्यातील गाव आज हि उघड्यावरच संपूर्ण गाव शौचालयास जात आहे .त्यामुळे पारदर्शी सरकारच्या घोषणाचा आरसा सोमोर आला आहे.अधिकाऱ्यानि फुगवलेली आकडेवारी पडताळून घ्यावी असे सरकारला वाटले नाही .केवळ कागदाच्या आधारवरती संपूर्ण महाराष्ट  हागणदारी मुक्त सरकारने करून टाकला आहे .त्यामुळे पारदर्शी सरकारच्या या घोषने अगोदर महाराष्ट्रातील संपूर्ण गावाचा सर्वे करूनच कोणत्याही घोषणा करव्यात कारण शासकीय कामात आकड्याचा खेळ असतो आणि तो कमी जास्त किवा खरा किवा खोटा आहे हे पडताळण्यास मुभा दिली जात नाही .हेच या मुख्यमंत्र्याच्या घोषाने वरून दिसत आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments