भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. क्रीडा लवादाकडून अपात्रतेबाबतचा निकाल आज येणार नाही. त्यामुळे चाहत्यांची प्रतिक्षा आणखी वाढली आहे…विनेशा फोगाटच्या अपात्रतेवरील निर्णय क्रीडा लवादानं राखून ठेवलाय.. क्रीडा लवाद 13 ऑगस्टला याबाबत निर्णय देणार आहे.. विनेश फोगाट हीचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झाल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर विनेशने क्रीडा लवादात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये तब्बल 3 तास युक्तीवाद चालला. विनेश फोगाट या सुनावणीत व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे उपस्थित राहिली. तर हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांनी युक्तीवाद केला. डॉ. एनाबेले बेनेट एसी एससी या विनेश फोगाट प्रकरणाचा निकाल देणार आहेत.. दरम्यान क्रीडा लवादानं वाढीव वेळ घेतल्याने विनेशला पदक मिळण्याची शक्यता आहे