बहुजन समाजातील समजला शिक्षणाची दारे खुली करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यात रयत शिक्षण संस्थेमार्फत रयत सायन्स अँड इंनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर रामनगर वर्ये या ठिकाणी आहे . सदरच्या कामाच्या निकृष्ट दर्जाच्या बाबत निवेदन दिले . पण त्यांची दखल घेतली नाही . अखेर जागरूक नागरिक मंदार गानु व सौ . पल्लवी गानु यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे . सदरच्या उपोषणाला अनेकांनी पाठींबा दिला आहे . रयत शिक्षण संस्थेचे रामनगर वर्ये येथील कामाचा ठेका नीरज प्रो प्राव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीला दिलेला आहे . त्याबाबत लेखी तक्रार रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱयांकडे करण्यात आली होती . सदर संस्था योग्य ती कारवाई करीत आहे . असे पत्र दिनांक १ जुलै २०२४ रोजी पत्र पाठवून उपोषणाचे आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये . अशी विनंती केल्यामुळे उपोषण आंदोलन झाले नाही . परंतु ,त्याबाबत प्रत्यक्षात जागेवर पाहणी केली असता रयत शिक्षण संस्थेने कोणतीही कार्यवाही केली नाही . ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत सातारा जिल्हाअधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी व गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे . या उपोषणाला वाढता पाठींबा मिळत आहे . सदर संस्थेमध्ये ग्रामीण भागातील बहुजन समाजाची अनेक मुले शिक्षण घेत आहेत . त्यांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे . एखांदी घटना घडून गेल्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जागी होते . परंतु आता जे घडलेले आहे . त्याबाबत जागृतपणे माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नाही . याला लोकशाही म्हणायचे आहे का ? असा प्रति प्रश्न उपोषणकर्ते श्री . मंदार गानू यांनी केलेला आहे . सदर उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार विजय मांडके ,अजित जगताप व मान्यवरांनी भेट देऊन पाठींबा दर्शवला आहे . रयत शिक्षण संस्थेसारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत एखांद्या ठेकेदाराची चूक दाखवून सुद्धा दुर्लक्ष केले जाते आहे . कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार खरोखरच रयत शिक्षण संस्थेमध्ये अमलात आणले जातात कि नाही .? असा प्रश्न आता बहुजन वर्गाला पडलेला आहे .



