पुरेसे संख्याबळ नसतानाही विधान परिषदेची निवडणूक जिकंत आपण कच्या गुरुचे चेले नाहीत ,हे शिवसेनेचे (ठाकरे गट ) मिलिंद नार्वेकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे . सर्वपक्षीय नेत्यांसोबत नार्वेकर यांचे चांगले संबंध आहेत . मतदानाच्या दिवशीच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना नार्वेकर यांना हलक्यातच घेऊन चालणार नाही . अशा आशयाचे विधान केले होते . निवडणुकीच्या निकालाने ते खरे ठरवले आहे .
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांची ओळख कट्टर शिवसैनिक अशीही आहे . मुंबईच्या मालंडमधील लिबर्टी गार्डन परिसरात त्यांनी शिवशेनेचे गटप्रमुख म्हणून काम सुरु केले . त्यानंतर ते मातोश्रीच्या अत्यंत जवळ गेले . त्यांनी लढवलेली हि पहिलीच निवडणूक ११ जागांसाठी १२ उमेदरवार असल्यांमुळे अनिश्चिता निर्माण झाली होती . एक उमेदवार विजय होईल ,इतकी मते तर नार्वेकर यांच्या पक्षाकडे नव्हती . काँग्रेसच्या मतावर त्यांचे भवितव्य अवलंबून होते . सर्वच पक्षात मित्र असल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला .
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत बाहेर पडले . त्यावेळी मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार ,अशा अफवा पसरल्या होत्या . मी उद्धव ठाकरेंचा आनंद दिघे आहे ,असे म्हणणाऱ्या नार्वेकर यांनी त्या अफवाच असल्याचे सिद्ध केले . त्यांनी ठाकरेंची साठी सोडली नाही .
ठाकरे गटात असले तरी शिंदे यांनाही ते भेटत राहिले . मात्र,ते शिंदे यांच्या जाळ्यात अडकले नाहीत . नार्वेकर शिंदे गटात जाणार ,अशा अफवा लोकसभा निवडणुकीच्या तोंडारवरही पसरल्या होत्या . या अफवा खोडून काढण्यासाठी नार्वेकर कधीही माध्यमांसमोर आले नाहीत . त्यांनी अशा बातम्यांना फारसे महत्व दिले नाही .
मिलिंद नार्वेकर आता आमदार झाले आहेत . यासोबतच ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक ,शिवशेनेचे सरचिटणीस आहेत. एक साधा शिवसैनिक ते उद्धव ठाकरे यांचे पीए ,असा नार्वेकर यांचा प्रवास रंजक आहे . हा साधा शिवसैनिक ,म्हणजे नार्वेकर १९९२ मध्ये पहिल्यांदा मोतोश्रीवर पोचले ते विभागप्रमुखपद मिळावे म्हणून . ते ज्या भागात गडप्रमुख म्हुणुन काम करत होते . त्या वॉर्डाचे विभाजन झाले होते . त्यामुळे आपल्याला विभागप्रमुखपद मिळेल ,अशी आशा त्यांना होती. त्यांच्या कामाच्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून घेतले . वर्षभर त्यांनी मोतोश्रीवर हाताला लागले ते काम केले . १९९३ मध्ये ते उद्धव ठाकरे यांचे पीए बनले .
पुढे २०२२ पर्यंत शिवसेना नेते ,कार्यकर्ते अन्य पक्षातील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्या भेटी -गाठींचे नियोजन नार्वेकरच करायचे . २००२ मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली . उद्धव ठाकरे यांची वेळ देणे ,त्यांचे दौरे आखणे याची जबादारी नार्वेकर यांच्यावर आली . ठाकरेंनी त्यांना कामाचे पूर्ण स्वात्र्य दिले . ठाकरेंचे शिवसेनेतील स्थान वाढत गेले तसे नार्वेकर यांचेही वजन वाढत गेले . शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्यासमोर एखादी अडचण अली की ,ती सोडवण्यासाठी नार्वेकर नेहमी पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांचा नार्वेकर यांच्यावर प्रचंड विश्वास आहे . असे सांगितले जाते की बाळासाहेब ठाकरे यांना नार्वेकर सुरवातीला आवडत नहव्ते ,मात्र उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबादारी सांभाळ्र्यांनंतर बाळासाहेबांचा दृष्टीकोन हळूहळू बदलत गेला . नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्यकर्ते ,नेते ,पत्रकारांना भेटू देत नाहीत . असा आरोप शिवसेनेच्या काही नेत्यांनी नार्वेकर यांच्यावर केला होता . पण खरे काय ,हे कधी समोर
आले नाही . नार्वेकर यांचे मोतोश्रीवर वजन वाढत होते . त्यामुळे ते काही नेत्यांना जड वाटू लागले होते . मिलिंद नार्वेकर यांना अपमानास्पद वागणूक दिली ,असा आरोप नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना केला होता . भास्कर जाधव यांनीही शिवसेना सोडताना असा आरोप केला होता . असे सांगितले जाते . माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे . असे राज ठाकरे म्हणाले होते . त्यांचाही अप्रत्क्ष रोख नार्वेकर यांच्याकडेच होता ,अशी चर्चा त्यावेळी होती .
असे अनेक चढ उतार पाहिलेल्या नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडली नाही . नार्वेकर शिंदे गटात जाणार ,अशा चर्चा अलीकडेपर्यंत सुरु होत्या . उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना बाजूला केले आहे . अशाही चर्चा मध्यतंरी झाल्या होत्या . त्यावर ठाकरे किंवा नार्वेकर यांनी एकदाही जाहीर वक्त्यव्य केले नाही . नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले ,तसे त्यांनी अन्य ,पक्षातील ,अगदी शिंदे गटातील नेत्यांशीही संबंध चांगले ठेवले . त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत ते विजयी झाले .