वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या नावे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावात स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली . मात्र जेवढी जमीन करण्यात आली . त्यापेक्षा जास्त जमिनीवर खेडकर कुटूंबाने दावा करायला सुरवात केली . मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला ,तेव्हा पूजा खेडकर यांनी चक्क पिस्तूल काढून या शेतकऱ्यांना धमकावले . या शेतकऱ्यांनी जेव्हा पोलिसांकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला ,तेव्हा पोलिसांनी देखील दखल घेतली नाही . त्यामुळे पुण्यात कायदयाचे राज्य आहे की मुळशी पॅटर्न सुरु आहे ?असा प्रश्न उपस्थित होतो आहे .
हातात पिस्तूल घेऊन धमकावणाऱ्या मनोरमा खेडकर या पूजा खेडकर यांच्या आई आहेत . कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे . त्या
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आणि सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या दिलीप खेडकर यांच्या पत्नी आहेत . मुळशी तालुक्यातील धडवली गावात पासलकर आणि मरगळे कुटूंबीय वडलार्जित भात शेती कसतात. काही महिन्यापूर्वी पासलकर कुटूंबातील एकाला हाताशी धरून पूजा खेडकर यांच्या नावाने जमीन खरेदी करण्यात आली . त्यानंतर खेडकर कुटूंबाची अरेरावी सुरु झाली .
ही जमीन खेडकर कुटूंबीयांच्या सामाईक मालकीची असून अजून या जमिनीच्या वाटण्या झालेल्या नाहीत . असा पासलकर कुटूंबियांचा दावा आहे . मात्र खेडकर कुटूंबाने मन मानेल त्या ठिकाणी जमिनीवर दावा करायला सुरुवात केली . त्याला विरोध करणाऱ्या मरगळे आणि पासलकर या शेतकरी कुटूंबानी जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा पेटवून देण्यात आला . तर कधी त्यांच्या शेळ्यांवर कुत्री सोडण्यात आली . मुळशी भागातील जमिनी हडप करण्यासाठी लॅन्ड माफियांनी मांडलेला उच्छाद मुळशी पॅटर्न सिनेमातप्रेक्षकांनी पहिला आहे . मात्र इथं ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते खेडकर कुटूंबच हा पॅटर्न राबविताना दिसतंय .
प्रेमात पाडाव असा इथला निसर्ग आहे . पानशेत आणि वरसगाव धरणाचं पाणलोट क्षेत्र आणि त्याला लागून असलेली ही भातशेती आहे पण काही वर्षांपूर्वी इथल्या या निसर्गाला लॅन्ड माफियांचे ग्रहण लागले . लॅन्ड माफियांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ मिळाली . खेडकर कुटूंबाने देखील इथे शेतजमीन खरेदी केली .आणि इथे वाडलार्जित शेती करणाऱ्या पासलकर कुटूंबियांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला . या कुटूंबाने याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला . तेव्हा उलट पौड पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले .
खेडकर कुटूंबाने मुळशी तालुक्यातील अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे . मात्र राजकीय वरदहस्त लाभल्याने खरेदी केलेल्या जमिनी बरोबरच स्थानिक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा त्यांच्याकडून जमिनीवर ताबा मिळवण्याचा त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होतोय . त्यासाठी अगदी पिस्तुलाने धमकावण्या पर्यंत त्यांची मजल गेली आहे .