Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedघाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून अपघात

घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून अपघात

वादळाचा आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका मुंबईला बसला आहे. जोरदार वा-यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्या आहेत. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.  67 जण जखमी झाले आहेत. 100 हून अधिक लोकं होर्डिंगखाली अडकले होते. . NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तातडीने बचाव कार्य सुरु आहे.

मुंबईत जोरदार वा-यांमुळं घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडलीय. घाटकोपर पश्चिम येथील रमाबाई नंगर परिसरात भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला. या घटनेत तब्बल 35 जण जखमी झाले आहेत. या होर्डिंगखाली 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, हे होर्डिंग बेकायदा होतं. ते उभारणा-याला अटक करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments