Thursday, May 1, 2025
HomeMain Newsदुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही' स्टेटस ठेवत 26 वर्षीय...

दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही’ स्टेटस ठेवत 26 वर्षीय ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

लातूर  मध्ये एका 26 वर्षीय तरूणाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. मृत तरूणाचं नाव महेश कदम  आहे. लातूर मधील ढाळेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये तो सदस्य होता. सोबतच सक्रिय मराठा कार्यकर्ता होता. मराठा आरक्षणावरून चिंतेत असलेल्या महेशने आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे. “दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही,” असा स्टेटस ठेवून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाचा आरक्षण प्रश्नी एल्गार सुरू आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे राज्यातील उमदे तरूण आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत आहेत. महेश याच्या घरातील आर्थिक स्थिती चांगली होती. शिक्षणाने चांगला होता पण अपेक्षित नोकरीच्या शोधात असताना त्याने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं आहे. विषारी औषध घेत त्याने आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.

महेशच्या घराची चांगली शेती होती. शिक्षणही झालं असल्याने तो नोकरीच्या शोधात होता. महेशचे वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. महेश मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होता. पण मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने त्याने तो चिंतेत होता त्यामधूनच त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

किनगाव पोलिस स्टेशन मध्ये येणार्‍या ढाळेगावातील घटनेने सारा परिसर सुन्न झाला आहे. सध्या पोलिस महेशच्या आत्महत्येनंतर तपास करत आहेत. सध्या त्याच्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम झाले असून अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. अहमदपूर पोलीस ठाण्यात महेशच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. मागील 4 दिवसांपासून मनोज जरांगे  पाटील मराठा आरक्षण प्रश्नी जालना मध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांनी राज्यात गावागावा मध्ये साखळी उपोषण करत संयम मार्गाने आरक्षणासाठी हा लढा देण्याचं आवाहन केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments