शिरपूर पोलिसांनी गुरुवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये कराड तालुक्यातील दोन जणांना अटक केली आहे . त्यांच्याकडून एक लाख ८० हजार रुपये किमतीची ४ गावठी बनावटीची पिस्तूल ,१० हजार रुपये किमतीचे २ अतिरिक्त मॅगझीन ,७ हजार रुपये किमतीची ७ जिवंत काडतुसे असे एकूण १ लाख ९७ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे . निलेश हनुमंत गायकवाड वय ३० रा . वडगाव हवेली ता . कराड जि . सातारा मनीष संजय सावंत वय २२ रा. सातारा असे अटक केलेल्या युवकांची नावे आहेत .