शिंदे गटाचे नेते आणि सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण कृषी उत्पन्न बाजारसमितीवर आघाडी घेतली आहे. देसाई यांच्या गटाने ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा २२५ मतांच्या फरकाने जिंकत विजय प्राप्त केला आहे. जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई हे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना मोठा झटका बसला आहे. हॅलो महाराष्ट्र आपल्यापर्यंत ब्रेकिंग बातम्या पोहोचवण्यासाठी तत्पर असून हि बातमी सातत्याने अपडेट केली जात आहे. तेव्हा निकालाचे सविस्तर वृत्त पाहण्यासाठी हि बातमी रिफ्रेश करा.
पाटण कृषी बाजार समिती निकाल नुकताच हाती आला आहे. पाटण बाजारसमितीवर शंभूराज देसाई यांनी 45 वर्षानंतर बाजी मारली असून यामुळे पाटणकर यांना धक्का बसला आहे. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतर झाले असून सविस्तर आकडेवारी थोड्याचवेळात येथे अपडेट करण्यात येईल. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रदीर्घ काळाने सत्ता मिळवली आहे.
पाटण शेती उत्पन्न बाजारसमितीत शिंदे गट शिवसेनेला 15 जागा प्राप्त झाल्या आहेत तर राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी झाली आहे. विजयी उमेदवारांची सविस्तर यादी काही मिनिटांमध्ये येथे अपडेट करण्यात येईल तेव्हा ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडलेले रहा.
पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात हाोते. येथे पारंपरिक पालकमंत्री शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर गटात अटीतटीची लढत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघ जिंकून मंत्री देसाई यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे.
सातारा जिल्हात 93.33% असे विक्रम मतदान मतदारांनी केले आहे. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य हे मतदान पेटीमध्ये बंद आहे. यामुळे नेमका गुलाल कोणाच्या अंगावर पडणार आणि कोणाला हार पतकरावी लागणार हे पाहणे उत्सुकताच ठरणार आहे.
पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा २२५ मतांच्या फरकाने मंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई हे उमेदवार विजयी झाले आहेत.
तर व्यापारी मतदारसंघाततून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब महाजन( ३३६ मते ) अरविंद पाटील (३२३) मते घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना मोठा झटका बसला असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण भिस्त सोसायटी मतदार संघावर आहे.