Friday, August 8, 2025
HomeMain Newsकसब्यात MVA ची हवा, रविंद्र धंगेकर मारणार बाजी ? चिंचवडचा कौल कुणाला?...

कसब्यात MVA ची हवा, रविंद्र धंगेकर मारणार बाजी ? चिंचवडचा कौल कुणाला? एक्झिट पोल घ्या जाणून

कसबा आणि चिंचवड या विधानसभेच्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. पुणे जिल्ह्यात असलेल्या या दोन्ही मतदारसंघातील निवडणूक विविध कारणांनी जोरदार गाजली. या जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकांसाठी मतदानही पार पडले. आता सर्वांनाच उत्सुकता आहे निकाल कधी लागतो याची. दरम्यान, मुख्य निकालापूर्व विविध संस्थाने केलेल्या एक्झीट पोल्सचा निकाल आला आहे. या निकालानुसार कसब्यामध्ये महाविकासआघाडीची हवा आहे. तर चिंचवडमध्येही महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यात अत्यंत घासून सामना होणार असे दिसते. काय सांगतो एक्झिट पोल्सचा अंदाज.

स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन्ही संस्थांनी केलेल्या वेगवेगळ्या अभ्यासानुसार एक्झिटपोल्सचे अंदाज वेगवेगळे वर्तविण्यात आले आहेत. जे चांगलेच व्हायरल झाले आहेत. स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च संस्थच्या अभ्यासाचा दाखला देत एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपला जोरदार धक्का बसू शकतो. या ठिकाणी महाविकासआघाडीच्या वतीने मैदानात उतरलेले काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी होण्याची शक्यात अधिक आहे. तर या उलट चिंचवड मतदारसंघात भाजपसाठी बऱ्यापैकी संधी आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप विजयी होऊ शकतात.

स्ट्रेलिमा एक्झिट पोल: स्ट्रेलिमाच्या एक्झिट पोल कसब्यामध्ये भाजपवर काँग्रेस या वेळी मात करु शकते. या ठिकाणी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे साधारण 15,077 मतांनी विजयी होऊ शकतात. कसबा मतदारसंघात हेमंत रासने – 59,351, तर रविंद्र धंगेकर – 74,428 मते घेण्याची शक्यता आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप साधारण 32,351 मतांनी बाजी मारतील. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नाना काटे दुसऱ्या क्रमांकावर राहतील. काटे यांना 93,003 मतं तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अपक्ष उमेदवारास 60,173 मते मिळू शकतात.

रिंगसाईड रिसर्च एक्झिट पोल (Ringside Reasearch): चिंचवड विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप पहिल्या क्रमांकाची मते मिळवून विजयी होऊ शकतात. खऱ्या अर्थाने तिरंगी लढत होत असलेल्या या निवडणुकीत महाविकासआघाडीकडून रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे दुसऱ्या तर अपक्ष राहुल कलाटे तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवू शकतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments