Saturday, August 9, 2025
HomeMain Newsजयकुमार गोरेंच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

जयकुमार गोरेंच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्याच्या वडिलांनीही हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, गोरेंच्या अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रात्री-अपरात्री प्रवास करणं टाळायला पाहिजे. पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही. मात्र, सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी,” असे पवार यांनी म्हंटले आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालयानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या अय ठिकाणी त्याच्यावर उपचार केले जात आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी रुग्णालयात जाऊन आमदार जयकुमार गोरे यांची काल भेट घेतली.

दरम्यान गोरे यांच्या अपघाताच्या घटनेवर खासदार शरद पवारांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. राजकीय नेत्यांनी रात्री-अपरात्री प्रवास करणं टाळायला पाहिजे. पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही, असे पवार यांनी यावेळी म्हंटले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments