Sunday, March 8, 2026
HomeMain Newsअडचण नव्हती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला ५१ हजार बक्षीस देण्यास - दिपक पवार

अडचण नव्हती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला ५१ हजार बक्षीस देण्यास – दिपक पवार

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांस बक्षिसाची रक्कम आम्ही (संयोजक म्हणून द्यावी असं यजमानपद घेताना ठरलं नव्हते . आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषेदेस एकवीस लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला . त्यातून प्रशिक्षकांचे मानधन ,गुणफलक अन्य तांत्रिक यंत्रणेसाठी वापरले जातात . कोटयावधी रुपये खर्च केले अन एकावन्न हजार रुपये द्यायला कोणतीच अडचण नव्हती असे सातारा तालीम संघांचे संघटक व या स्पर्धेचे संयोजक दीपक पवार यांनी स्पष्ट केले . राज्य कुस्तीगीर परिषेदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी ‘किताब कुस्ती स्पर्धा सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात शनिवारी झाली . यामध्ये कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला तर मुबंईचा विशाल बनकर उपविजय झाला . आज कोल्हापूर मध्ये पृथ्वीराजने आयोजकांकडून रोख रक्कम मिळाली नाही अशी खंत व्यक्त केली .

पाटील याने खंत व्यक्त केल्यानंतर या स्पर्धेचे संयोजक दीपक पवार यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि संयोजन समिती सातारा यांच्यात ठरलेल्या गोष्टीचा उलगडा केला . दरम्यान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांची आमच्याकडून अपेक्षा असेल तर जरूर आम्ही त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊ असेही पवार यांनी नमूद केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments