Friday, August 8, 2025
HomeMain Newsलस न घेतलेल्यांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी .

लस न घेतलेल्यांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी .

ओमिक्रोन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ज्या सूचना आल्या आहेत . त्या सूचनांची अंमलबजावणी सातारा जिल्यात सुरु करण्यात आली  आहे . ज्यांनी लस घेतली नाही अशांना शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही . उलट त्यांना ५०० रुपयांचा दंड केला जाईल ,त्याकरिता ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लास घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेलं आहे . दरम्यान ,ओमिक्रोनच्य पार्शभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज असून ऑक्सिजन आणि बेडची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे . आरटीपीसीआर टेस्टची तपासणी करण्याची क्षमता आपल्याकडे दररोज पाच हजार एवढी आहे . परदेशातून येणाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम विमानतळावरच केले जात आहे ,त्यांची माहिती मिळ्यानंतर त्यांना नियमानुसार अयोसोलेट व्हावे लागत आहे . असेही त्यांनी सांगलीतले आहे . जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते . यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले ,सध्या जिल्ह्यात कोरोनाचे उपचारार्थ २१६ रुग्ण आहेत . ओमिक्रोन व्हेरियंटची अजून भारतात एकही केस कन्फर्म नाही . परंतु डब्लू एचओने सांगितल्यानुसार काळजी घेणे महत्वाचे आहे . ओमिक्रोन हा डॉमिनोट  करतो . त्यामुळे दक्षता घेतली गेली पाहिजे . ओमिक्रोनच्या केसेस उजेडात यायला १५ ते १६ दिवस लागतात . त्यावर रिसर्च सुरु आहे . सातारा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तयार आहे . जम्बो कोविड हॉस्पीटल हे ३१ ऑक्टोबर पासून बंद केले असले तरीही गरज पडल्यास पुन्हा सुरु करण्यात येईल . त्याचबरोबर कराड ,म्हसवड ,पाटण ,कोरेगाव ,आदी ठिकाणी उपचार केंद्रे तयार आहेत .

मुलांसाठी स्वतंत्र उपचारांची सोय करण्यात आली आहे . जिल्ह्यात सध्या १७० मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन साठा आहे . दरम्यान औषधाचा तुटवडा जाणवणार नाही . याची हि तयारी करण्यात आली आहे .

शासकीय कार्यालयात ज्यांनी दोन डोस घेतले नाहीत अशांना येण्यास बंदी घातली आहे . शासकीय कार्यालयाच्या गेटवरच तपासणी होणार आहे . अशी व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे . ५०० रुपयाचा दंड केला जाईल . तसेच मास्क न घातलेल्या लोकांवर कारवाया  सुरु करण्यात येणार असून त्याकरता पथके तयार करून कारवाई करण्यात येईल .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments