Thursday, August 7, 2025
HomeMain News12 वर्षाच्या मुलाने शेअर बाजारात गुंतवले 16 लाख रुपये

12 वर्षाच्या मुलाने शेअर बाजारात गुंतवले 16 लाख रुपये

आपल्याकडे शेअर बाजार म्हटलं की सट्टा, जुगार, लाखाचे बारा हजार करण्याचा उद्योग, अशा प्रतिक्रिया सर्रास ऐकायला मिळतात. मात्र, याच शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणुकीवर दक्षिण कोरियातील अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने घसघशीत नफा कमवून दाखवला आहे.

क्वन जून असे या मुलाचे नाव आहे. शेअर बाजारातील चढउतार अनेकांना चक्रावून टाकतात. मात्र, इतक्या लहान वयातही क्वन जूनचे आर्थिक बाजारातील अंदाज अचूक ठरतात. त्यामुळेच क्वन जूनने अवघ्या वर्षभरात 43 टक्के नफा कमावला आहे.

गेल्याचवर्षी क्वन जून याने आईच्या मागे लागून स्वत:चे रिटेल ट्रेडिंग अकाऊंट सुरु केले. त्यानंतर क्वन जून याने आणखी एक कमाल करुन दाखविली. या खात्यात गुंतवणूक करण्यासाठी आई-वडिलांकडून 16 लाख रुपये मिळवण्यात तो यशस्वी ठरला. या भांडवलाच्या आधारे क्वन जून याने शेअर बाजारात पाय ठेवला. आज एका वर्षानंतर त्याने या गुंतवणुकीवर जवळपास 43 टक्के नफा कमावला आहे, अशी माहिती रॉयटर्सने दिली.

क्वन जून याला दुसरा वॉरन बफे व्हायचं आहे. भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वॉरन बफे हे श्रद्धास्थान आहेत. ते जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून मोठ्याप्रमाणावर नफा मिळवणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे.

क्वन जून याच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या मेमरी चीपची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ककाओ कॉर्प, सॅमसंग, हुंदाई यासारख्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. क्वन जूनचा कल हा दीर्घकालीन गुंतवणुकीकडे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणारा क्वन जून हा काही एकमेव लहान मुलगा नाही. उलट लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांचे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments