राज्यात नुकताच दहावीची निकाल जाहीर झाले. यात अनेक जण पास झाले तर काही जण नापास झाले. पण यासोबतच काही आर्श्चयकारक गोष्टीसमोर येत आहेत. अशातच जिद्द काय असते? याची व्याख्या सांगणारी एक घटना बीडमधून समोर आली आहे. बीडमध्ये एका विद्यार्थ्यांने 11 व्या प्रयत्नात दहावीच्या वर्गात यश मिळवलं. तब्बल 10 वेळा दहावीला नापास या मुलाने वडिलांच्या इच्छेसाठी जिद्दीला पेटून 11 व्या वर्षी यश मिळवलं आहे. यानंतर संपूर्ण गावाने त्यांची थेट मिरवणूकच काढली. या विद्यार्थ्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत 80-90 टक्के मिळवणाऱ्यांचे कौतुक होताना तुम्ही पाहिले असेल. त्यांचे मोठमोठे सत्कारही होतात. पण परळीतल्या डावी येथील कृष्णा सायस मुंडे याला गावाने डोक्यावर उचलून धरलंय. त्याची चर्चा सध्या गावभर आहे. कारण काय तर कृष्णा दहावी पास झालाय. बरं तुम्ही म्हणाल बोर्डातून पहिला आलाय? तर नाही. तुम्हाला वाटेल त्याला 90 टक्के मिळालेयत?…तर तसंही नाहीय. बीडच्या कृष्णा मुंडेनं अकराव्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण केलीय. निराश न होता सतत प्रयत्न करणाऱ्या कृष्णाच्या जिद्दीचं कौतुक केलं जातंय.