Friday, August 8, 2025
HomeMain News९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन

९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन

१९ जुलैपासून संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून, १३ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. कामकाजाचे यामध्ये १९ दिवस असणार आहेत. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

१९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिले सादर करु शकते. या दरम्यान, कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन अधिवेशनात केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments