Friday, August 8, 2025
Homeदेश८००० पत्रकारांना प्रशिक्षण देणार गुगल

८००० पत्रकारांना प्रशिक्षण देणार गुगल

गुगल इंडिया भारतातील ८००० पत्रकारांना येत्या वर्षभरात चुकीच्या बातम्यांना पत्रकार बळी पडू नयेत यासाठी प्रशिक्षण देणार आहे. इंग्रजीसह इतर सहा भाषांमध्ये पत्रकारांना यामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

भारतातील प्रमुख शहरांतील २०० पत्रकारांची गुगल न्यूज इनिशिएटिव्ह इंडिया ट्रेनिंग नेटवर्कच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. त्यामध्ये पाच दिवसांच्या इंग्रजी आणि सहा इतर भारतीय भाषांकरिता आयोजित केल्या जाणाऱ्या या कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल, या प्रशिक्षणांमध्ये त्यांचे कौशल्य सुधारले जाईल. याचबरोबर, प्रमाणित प्रशिक्षक या नेटवर्कमाध्यामातून आयोजित दोन-दिवसीय, एक-दिवसीय आणि अर्धवेळ कार्यशाळेत अधिक पत्रकारांना प्रशिक्षण देतील. दरम्यान, आपल्या निवेदनात गुगल इंडियाने म्हटले आहे की, ही प्रशिक्षण कार्यशाळा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि कन्नड या भाषांमध्ये संपूर्ण भारतात आयोजित केली जाणार आहे.

सत्य घटनेची चौकशी आणि ऑनलाइन पडताळणी असा या प्रशिक्षणाचा एकच उद्देश असणार आहे. फर्स्ट-ड्राफ्ट, स्टोरीफूल, ऑल्टन्यूज, बुमलाईव्ह, फॅक्टचेकर डॉट इन आणि डेटालाईडच्या तज्ज्ञांनी तयार केलेला अभ्यासक्रम या प्रशिक्षणात यासाठी वापरण्यात येणार आहे. गुगलसाठी विश्वसनीय आणि अधिकृत मीडिया स्रोतांचे समर्थन करणे प्रथम प्राधान्य असल्यामुळे भारतामध्ये चुकीच्या माहितीच्या विरोधात त्यांच्या लढ्यात पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इंटरन्यूज, डेटालाईड्स आणि बूमलाईव्ह करत असलेल्या सहयोगचा आम्हाला अभिमान वाटतो, असे गुगलने म्हटले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments