Saturday, August 9, 2025
HomeMain News५ हजारा पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती क्षेत्रात दुकान उघडण्यासाठी ...

५ हजारा पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती क्षेत्रात दुकान उघडण्यासाठी विषम तारखा ,अंमलबजावणी बाबत जिल्हाअधिकारीयांनी केले आदेश जरी

लॉक डाऊन मध्ये शिथीलता दिल्यानंतर सर्व आस्थापना उघडण्यासाठी  परवानगी देण्यात आली होती . परंतु बऱ्याच नागरिकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यामुळे व बाजारपेठेत अनावश्यक गर्दी होत असल्याने कोरोना  विषाणूचा प्रसार होण्याची  शक्यता  घेऊन कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या  असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये दुकान उघडण्यासाठी विषम  तारखा  दिल्या आहेत . या प्रतिबंधात्मक  अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी जरी केले आहेत .

हे आदेश सातारा तालुक्यातील लिंब,खेड ,शाहूपुरी ,कोडोली,संभाजीनगर ,देगाव ,नागठाणे ,अतीत ,काशीळ ,कोरेगाव तालुक्यातील कुमठे ,पाडली स्टेशन ,पिंपोडे बु ,वाठार ,(किरोली ) वाठार स्टेशन .माण ,तालुक्यातील पळशी ,गोंदवले बु ,बिदाल ,फलटण तालुक्यातील आसू ,विडणी ,कोळकी ,गुणवरे ,बरड ,गिरवी ,सांगावी ,पाडेगाव ,तरडगाव ,साखरवाडी (पिंपळवाडी) . खंडाळा तालुक्यातील शिरवळ ,वाई तालुक्यातील बावधन ,भुईंज , ओझर्डे ,पसरणी ,यशवंतनगर ,जावली तालुक्यातील

जावळी तालुक्यातील कुडाळ . कराड तालुक्यातील आटके .  ओंड ,उंब्रज ,बनवडी ,चरेगाव ,गोळेश्वर ,काले , कार्वे ,विंग ,कोपर्डे  हवेली ,मसूर ,मुंढे ,पाल,रेठरे ,बु ,सदाशिवगड, सैदापूर ,शेरे ,तांबवे ,वडगाव ,हवेली ,वारुंजी ,खटाव ,तालुक्यातील ,बुध ,खटाव ,पुसेगाव ,चितळी ,मायणी ,कलेढोण ,कुरोली (सिध्देश्वर),निमसोड ,पुसेसावळी ,औध ,व पाटण तालुक्यातील तारळे ,या ५ हजार पेक्षा  जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना लागू राहील .

या आदेशानुसार वरील ग्रामपंचायत  हद्दीतील हॉस्पिटल ,नर्सिंग होम ,व खाजगी ,डॉक्टराचे क्लिनिक २४ तास सुरु ठेवण्यास मुभा  देण्यात आली  आहे . ग्रामपंचायत हद्दीमधील किराणा  दुकाने ,औषधांची दुकाने ,खते  व बी-बियाणाची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेतच सुरु ठेवावीत .उर्वरित  सर्व प्रकारच्या  आस्थापना ,दुकाने केवळ विषम तारखेस सकाळी ११ ते ४ या वेळेतच चालू राहतील .ग्रामपंचात हदीतील  दारूची दुकाने जिल्हाधिकारी ,सातारा यांच्याकडील आदेशातील अटींच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास  मुभा राहील . आदेशाचे उलंघन कारण्याऱयांविरुद्ध  नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबधीताचा परवाना  तात्काळ  कायमस्वरूपी  रद्द  करण्यात येईल . तसेच या आदेशाचे उलंघन केल्यास  संबंधितांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७,दंड प्रक्रिया संहिता १९७३,आपत्ती  व्यवस्थापन अधिनियम . २००५ ,भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध  केला असे मानण्यात येईल  व संबधितावर  कारवाई करण्यात येईल . असेही जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आदेशात नमूद केले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments