Saturday, August 9, 2025
HomeMain News५ वर्षांत ३४७ गटार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

५ वर्षांत ३४७ गटार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गेल्या ५ वर्षांत देशभरात गटार व सेप्टीक टँक सफाई करणाऱ्या ३४७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक बळी उ. प्रदेशातले असल्याची माहिती लोकसभेत सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

२०१७मध्ये ९२, २०१८ मध्ये ६७, २०१९ मध्ये ११६, २०२० मध्ये १९, २०२१ मध्ये ३६ व २०२२ मध्ये १७ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. २०१९मध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असेही सरकारने सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीबद्दल व मृत्यूबद्दल राज्यसभेत सरकारने माहिती देताना सांगितले की, उ. प्रदेशात गटार व सेप्टीक टँक साफ करताना मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांची सर्वाधिक म्हणजे ४७ इतकी असून त्या खालोखाल तामिळनाडूत ४३, दिल्लीत ४२ श्रमिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर हरियाणात ३६, महाराष्ट्रात ३०, गुजरातमध्ये २८, कर्नाटकात २६, प. बंगालमध्ये १९, पंजाबमध्ये १४ व राजस्थानमध्ये १३ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी सरकार ५००० लोकसंख्या घनता असलेल्या शहरी व नागरी भागात सफाईसाठी मशीन यंत्रणा वापरण्यावर भर देणार असून ही यंत्रणा ३०० मिमी इतकी गटार लाइन साफ करू शकते.

डोक्यावरून मैला नेण्याच्या प्रथेला १९९३मध्ये पहिल्यांदा बंदी घालण्यात आली. त्यानंतर २०१३मध्ये या संदर्भातला एक कायदाही सरकारने मंजूर करून मैला वाहून नेण्यास बंदी घातली. कायद्याने बंदी असूनही देशात मैला वाहून नेण्याची प्रथा अस्तित्वात आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये देशात मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ५८,०९८ इतकी असून यातील ४२,५९४ कर्मचारी हे अनु.जातीमधील असल्याचे सरकारने संसदेत सांगितले होते.

फेब्रुवारी २०२१मध्ये सरकारने संसदेत हाताने मैला वाहून नेणाऱ्यांची संख्या ६६,६९१ इतकी असून यातील ३७,३७९ कर्मचाऱी उ. प्रदेशातले असल्याचे सांगितले होते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments