हणमंत किसन फरांदे हे त्यांच्या वैयक्तिक आकसापोटी आपल्या सातारा क्लब फोरमची नाहक बदनामी करीत आहेत . याबाबत क्लब व्यस्थापन त्यांच्यावर उचित कादेशीर कारवाई करणार असून फरांदे हे सभासदांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी नाहक गैरसमज पसरवीत आहेत . दरम्यान माजी जिल्हा सरकारी वकील विकास शिरगावकर पाटील यांना केवळ ५० हजार रुपयांमध्ये सभासदसत्व हवे होते . मात्र क्लब मध्ये तशी तरतूद नसल्याने त्यांनी आज त्याच नैराश्यातून सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली खदखद व्यक्त केली असल्याचा खुलासा सातारा क्लब फोरम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे .
प्रत्रकात म्हटले आहे की ,हणमंत किसन फरांदे यांना फेबुरवारी २०२३ मध्ये तत्कालीन सचिव यांनी क्लब मध्ये इन्व्हर्टर बसवणे व क्लब चा इलेकट्रिक मेटेन्स पाहणे या बदल्यात सभासदस्तव मंजूर केले होते . फरांदे यांनी केलेल्या कामाच्या दर्जाबाबत तत्कालीन व्यस्थापनाकडे अनेक तक्रारी आल्याने तसेच सेवा वेळेत मिळत नसल्याने दिनांक २५ मार्च २०१९ मध्ये तत्कालीन व्यस्थापक सचिव यांनी सादर केलेल्या व तत्कालीन माजी अध्यक्ष यांनी मंजूर केलेल्या टिपनीनुसार फरांदे यांचे लाईट कामाच्या दुरुस्तीसाठी दिलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले . या आकसापोटी व त्याचा राग मनात धरून फरांदे यांनी क्लब नूतनीकरण कामात अडथळे निर्माण करणे ,विदुत साहित्य खरेदी बाबत आक्षेप घेणे ,विदुत ठेकेदारांना धमकावणे ,व्यस्थापन समिती सदस्य यांच्याशी हुज्जत घालणे ,साभासदांशी गैरवर्तुणूक करून त्यांना असभ्य भाषा वापरणे ,
शिवीगाळ करणे अशा प्रकारचे वर्तन त्यांनी केले . फरांदे यांच्या क्लब मधील गैरवर्तनाचा विचार करून २०१९ मध्ये तत्कालीन अध्यक्ष श्वेता सिंगल यांनी दिनांक २५ मार्च २०१९ आदेशानुसार फरांदे यांचे सभासदस्तव रद्द केले आहे . त्यानंतर कोरोना काळामध्ये क्लब बंद असल्यामुळे याबाबतीत पुढील कारवाई प्रलंबित राहिली . हि बाब कार्यकारणी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर फरांदे यांनी वार्षिक मेटेन्स फी पुढील आदेश होईपर्यंत नये ,असा निर्णय घेतला . फरांदे याना क्लब व्यवस्थपकामार्फत याबाबत अवगत करून सुद्धा त्यांनी त्यांची आर्थिक वर्ष २०२४-२५ ची वार्षिक मेटेन्स फी ऑनलाईन अदा केली आहे . त्यामुळे त्याची पावती देण्यात आलेली नाही . त्यांनी भरणा केलेली रक्कम धनादेशा द्वारे परतावा करण्याची प्रक्रिया सुरु आहे . सातारा क्लब हि संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत नाही . असे फरांदे म्हणत आहेत . प्रत्यक्षात दिनांक १८८५ मध्ये सातारा क्लब ची स्थापना ब्रिटिश सरकारने केलेली आहे . हा क्लब गेली १२९ वर्ष अस्तित्त्वात आहे . परंतु त्याची कुठेही नोंदणी झाली नसल्याने सातारा क्लब फोरम या नावाने प्रथमच दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी कंपनी कायदा २०१३ मधील कलम (८) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे . क्लबला तसे प्रमाणपत्र मिळालेले आहे . सातारा क्लब मध्ये जमा झालेल्या सभासद शुल्कातून करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाच्या खरेदीच्या निविदा मागवून त्यावर नियुक्त तांत्रिक कमिटीमार्फत शहानिशा होऊन कार्यकारणी समिती सदस्य सभेमध्ये त्या मंजुरी घेण्यात येते . त्या अनुषंगाने पुढे होणारा प्रत्येक खर्च हा तांत्रिक कमिटीमार्फत मंजूर करून त्याला सचिव मान्यता देतात . अधीशांच्या अंतिम मंजुरी नंतर देयके अदा केली जातात . दरम्यान माजी सरकारी वकील विकास शिरगाववकर पाटील यांना केवळ ५० हजार रुपयात सभासदस्तव हवे होते . मात्र सातारा क्लब मध्ये तशी तरतूद नसल्याने त्यांना क्लबचे सभासदस्तव देता येत नव्हते . याच नैराश्यातून त्यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली खदखद व्यक्त केल्याचा खुलासा क्लब फोरम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे .