सामाजिक कार्यकर्ते, आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन झाले. ते ८० वर्षांते होते. ते लीव्हर सोरायसीसने आजारी होते. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना सोमवारी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अॅण्ड बायलरी सायन्सेसमध्ये (ILBS) दाखल करण्यात आले होते. आज संध्याकाळी ६ वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
आपल्या भगव्या कपड्यामुळे प्रसिद्ध असणारे, स्वामी अग्निवेश आर्य समाजाचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता आणि १९७७ मध्ये ते हरियाणाचे शिक्षणमंत्रीही होते.
बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याने प्रसिद्धीच्या झोटामध्ये आलेले स्वामी २०११ मध्ये लोकपाल आंदोलनामध्ये अण्णा हजारे यांच्याबरोबर सहभागी झाले होते. नंतर मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून बाहेर पडले होते.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि त्यांना मारहाण केली होती.



