सोनगाव तर्फे सातारा उरमोडी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावर बेकादेशीर वाळू उपशाचे काम चालू आहे.ज्यामुळे पाणी दुषित होऊन साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे .सदर वाळू उपसा करणारे ग्रामसेवक व सरपंचांना हाताशी धरून काम चालू असून यामधील काही लोकांचे बांधकामे सुरु असून या परिसरातील चालू असलेल्या बांधकाम परिसरात वाळूचे साठे करण्यात आले आहेत .ते तपासून पंचनामे करावेत अशी मागणी ग्रामस्थानमधून होत आहे .
या नदी पात्रातील वाळू उपसा हा गाढवाच्या साह्याने केला जात आहे .जेणे करून कुणाचे लक्ष जाणार नाही .तलाठी व सरपंच याच्याकडून खुलासा व्हावा व या लोकांनावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .