सेबीच्या अध्यक्षांचे अदानी ग्रुपसोबत आर्थिक संबंध असल्याचा दावा हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. अदानी ग्रुपच्या घोटाळ्यात सेबीच्या अध्यक्षांचंही कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आलाय. सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची ऑफशोर फंडामध्ये मोठी भागीदारी असल्याचा गंभीर आरोप हिंडनबर्गच्या रिपोर्टमधून करण्यात आलाय. फंडातील रक्कम अदानी ग्रुपनं वापरली. ही रक्कम साईफनिंग घोटाळ्यात वापरण्यात आली. अदानी ग्रुपविरोधातील चौकशीत सेबीची भूमिका संशयास्पद आहे, असे धक्कादायक दावे या रिपोर्टमधून करण्यात आलेत. हिंडनबर्गनं सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केलेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय.



